Amravati विधानपरिषद निवडणुकीत मोठा धक्का, विधानपरिषदेत विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज रद्द

अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेतून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे…शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून रद्द ठरवण्यात आला आहे…प्रतिज्ञापत्रातील तांत्रिक त्रुटींवरून काँग्रेस आणि भाजपकडून दाखल करण्यात आलेले आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरवत हा निर्णय दिला…सुमारे तीन तास चाललेल्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला असून…या निर्णयामुळे विप्लव बाजोरिया यांना मोठा धक्का बसला आहे…त्यामुळे आता बाजोरिया निवडणुकीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडले आहेत…दरम्यान, या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी सर्वांनी संगनमत करून आपला अर्ज रद्द केल्याचा आरोप केला आहे…तसेच आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे…

संबंधित व्हिडीओ