आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत.. मात्र आज सायंकाळी तब्बल तीन तास झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळालं... अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पावसाचे पाणी साचले, तर प्रमुख चौक आणि मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकासकामांचा आणि मुसळधार पावसाचा दुहेरी फटका नाशिककरांना बसल्याचे आज दिसून येतंय..