एका प्रकरणात आरोपी असलेले चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे विधानभवनात मुक्तपणे वावरताना दिसले..बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षणसंस्थांसाठी जागा आणि अनुदान लाटल्याचा त्यांच्यावर बोंद्रे यांच्यावर आरोप आहे. तसंच चिखलीत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांना ते सापडत नाहीत, आणि विधानभवनात मात्र सुरू असलेला त्यांचा वावर हा चर्चेचा विषय ठरलाय. त्यामुळे प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.