सांगली महापालिकेच्या महासभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला… काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी थेट महापौरांच्या पीठासनावरून राजदंड पळवल्याची घटना घडली आहे… पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या ६११ कोटींच्या निधीच्या कामांवर सविस्तर चर्चा व्हावी, आराखडा नागरिक आणि नगरसेवकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत असताना सभेत मात्र चेष्टा-मस्करी सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला… याच संतापातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे… या घटनेमुळे महासभेत एकच खळबळ उडाली असून राजकीय वाद आणखी तापण्याची शक्यता आहे