जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.देऊळगाव कापूसवाडी परिसरात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय.महिलेवर तिच्या परिचयातील मित्रांसमोरच दोन आरोपींनी जबरदस्ती सामूहिक अत्याचार केल्याची माहिती आहे. महिलेसोबत कृत्य करताना या दोन्ही नराधमांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या दोघांनी महिलेवरील अत्याचाराचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचेही समोर आले आहे.