Nagpur मध्ये इमारतीचा भाग कोसळला; मलबा हटवण्याचं कामही युद्धपातळीवर; घटनास्थळावरुन घेतलेला आढावा

नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू परिसरात आज मोठी दुर्घटना घडली आहे… गांधीबाग येथील बॉम्बे स्कूटर्स या इमारतीचा काही भाग कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे… चौथ्या मजल्याचा हा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे… या दुर्घटनेत एक कार आणि तीन मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे… घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे… सध्या मलबा हटवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असून, नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे… याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी…

संबंधित व्हिडीओ