१००० जणांचा बळी घेतल्यानंतर युरोपमधील तापमान लक्षणीयरित्या बदललंय. शनिवारी संध्याकाळी युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँडसमध्ये वादळी वाऱ्यासह विजांनी चांगलाच थयथयाट घातला. युरोपचं आकाश या विजांच्या लख्ख प्रकाशानं उजळून निघालं. तर तापमानातही सुमारे १० अंशांनी घट पाहायला मिळाली. मात्र तत्पूर्वी जवळपास दोन महिने तिथल्या उन्हाळ्यात कधीही न पाहिलेली, अनुभवलेली तापमानवाढ दिसली. पाहूया युरोपमधल्या वातावरणातील तीव्र बदलांचा हा ग्लोबल रिपोर्ट....