घोडबंदर रोडवरील चेणे गावाजवळ खड्डा चुकवताना रिक्षा थेट खाडीत कोसळून प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.. या घटनेची बातमी NDTV मराठीने दाखवल्यानंतर वाहतूक विभागाने तातडीने पुढाकार घेत रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केलंय... आणखी अपघात होऊ नयेत आणि वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी स्वतः जेसीबी बोलावून फाऊंटन हॉटेल परिसरासह घोडबंदर रोडवरील अनेक ठिकाणी खड्डे बुजवलेत.. दरम्यान, या कारवाईमुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला असला, तरी घोडबंदर रोडवरील कायमस्वरूपी दुरुस्ती आणि सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.