मुंबई महापालिकेत नव्या गाड्यांच्या मागणीवरून आता राजकारण अधिक पेटलय. इनोव्हा गाड्यांच्या मागणीवरून आता भाजपने किशोरी पेडणेकरांनाच धारेवर धरलंय.. मी ट्रेनने जातो मला गाडीची हौस नाही असं भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी म्हटलंय. तर यापुढे किशोरी पेडणेकरांची कोणतीही मागणी प्रतिज्ञापत्रावर आली तरच दखल घेऊ असाही निशाणा खणकरांनी साधलाय. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनेही नव्या गाड्यांना विरोध केलाय. आरोग्याचा त्रास होत असेल तरच गाडी द्या असं अमेय घोले यांनी म्हटलंय.