झारखंडमधील धनबाद येथे अवैध कोळसा खनन, तस्करी, खंडणी आणि लेवी वसुलीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल 31 ठिकाणांवर छापेमारी करत ईडीने सुमारे 160 कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक गोठवली आहे. याशिवाय 1 कोटी 2 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केलीय.. धनबादमधील अवैध कोळसा साखळीविरोधातील ही ईडीची आतापर्यंतच्या मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे