Nagpur पोस्टद्वारे पोलिसांना आव्हान, आरोपी अमीन पटेल ताब्यात; व्हायरल पोस्टप्रकरणी कारवाई

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून हत्या आणि हिंसक घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे.. अशातच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात एका तरुणाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट करत थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना समोर आली.. नंदनवन पोलिसांनी गंभीर दखल घेत तातडीने संबंधित तरुणाचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांच्या कारवाईनंतर संबंधित तरुणाने आपल्या कृत्याबद्दल जाहीर माफी मागितली. सोशल मीडियाचा गैरवापर करून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नंदनवन पोलिसांनी दिलाय.. अमीन पटेल असं रील करणाऱ्या आरोपीचे नाव आहे...

संबंधित व्हिडीओ