विदर्भात दोन महिन्यांनंतर जोरदार पाऊस बरसतोय.. गडचिरोली, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूरमध्ये पावसाने कहर केलाय.गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. विशेषतः भामरागड तालुक्यात अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झालंय.. अनेक ठिकाणी बचावकार्य करण्यात येतंय..वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे बोरगाव ते आलोडा मार्ग बंद कऱण्यात आला आहे.. तिकडे अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघानदी आणि ब्राम्हणवाडा थडी गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय...