शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक असताना, सत्ताधारी आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट सरकारलाच 'गरज पडल्यास कर्ज काढा आणि वचन पाळा' असा सल्ला दिला आहे. तिन्ही सत्ताधारी पक्षांनी जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी अजून संपलेली नाही. कर्जमाफी झाल्यावरच शब्दातून मुक्त होऊ, असे सत्तार म्हणाले. या वक्तव्यामुळे विरोधकांना सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे.