कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून केली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी आरएसएसला 'भारतीय तालिबान' म्हटले आहे. या गंभीर आरोपांमुळे भाजप आक्रमक झाला असून, काँग्रेसवर राष्ट्रविरोधी मानसिकतेचा आरोप केला आहे. या वादग्रस्त मागणीनंतर कर्नाटकातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.