रद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष भाकरी फिरवणार असून, दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. रोहित पाटील यांची तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधण्याची ओळख आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या जागी रोहित पाटील यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे.