दिवाळी सणाचा पहिला दिवस येतो तो म्हणजे धनत्रयोदशी! धनत्रयोदशीला उत्तर भारतात धनतेरस म्हणतात. धनत्रयोदशीला धन्वंतरीची म्हणजे आयुर्वेदाची पूजा केली जाते. कुटुंबासाठी सुदृढ आरोग्याची प्रार्थना केली जाते. तसंच देवी लक्ष्मी आणि कुबेरांचीही पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या देवांची पूजा केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि समृद्धी, संपत्ती, आरोग्य आणि आनंद मिळतो. धनत्रयोदशीची तिथी काय आहे. पूजा करण्याची शुभ वेळ कोणती हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत.