कबुतरखाने बंद करण्यावरून जैन समाजाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर 'सामना' अग्रलेखातून संतप्त टीका करण्यात आली आहे. 'कबुतरांसाठी धर्मसभा' आयोजित करणे, 'शस्त्र उचलण्याची' हिंसक भाषा करणे आणि 'कबुतरांसाठी एक-दोन माणसे मेल्याने काय होते?' अशा वक्तव्यांवरून 'सामना'ने जैन मुनींवर आणि भाजपवर थेट हल्ला चढवला आहे.