आजपासून हिंदू धर्मातील पवित्र असलेला अधिक मास महिना सुरू होतोय..या महिन्यांमध्ये जावयांना धोंड्याचे जेवण दिले जाते.याच अनुषंगाने अहिल्यानगरजवळ असणाऱ्या श्रीक्षेत्र काळभैरवनाथ आगडगाव देवस्थानच्यावतीने गावासह परिसरातील 500 जावयांना धोंड्याच्या जेवणाचं आयोजन करण्यात आलं असून आलेल्या सर्व जावयांना पाच पोशाखसह मुलींना पैठणी भेट देण्यात आली आणि त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली... यावेळी 15 हजार भाविक जेवतील एवढा महाप्रसाद तयार करण्यात आला.तर १००० किलो हरभरा डाळीचे पुरण यावेळी तयार करण्यात आला आहे... यांदर्भात देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी.