बातमी आहे NDTV मराठीच्या इम्पॅक्टची.NDTV मराठीच्या बातमीची खासदार श्रीकांत शिंदेंनी दखल घेतलीय.कसाराजवळच्या दापूरमाळ गावातील पाणीटंचाई समस्या शिवसेना सोडवणार.श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन तर्फे या गावाला मदत करण्यात येणार आहे.NDTV मराठीनं काही वेळापूर्वीच कसाराजवळच्या दापूरमाळ या तहानलेल्या गावाची व्यथा मांडली होती. या बातमीची खासदार श्रीकांत शिंदे यांनी दखल घेतलीय.