राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरु असलेल्या नाराजीनाट्यात रोज नवीन नवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायलामिळतोय. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवार हे शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले.या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याची बाब समोर आल्यानंतर सगळ्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली होती. त्यानंतर फडणवीस आणि पार्थ पवारांची भेट झालीय. या भेटीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय..