राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे…अजित पवारांबाबत एका कथित ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा रंगली आहे…या क्लिपमध्ये पक्षातीलच दोन नेत्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला जातोय…तर दुसरीकडे पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अचानक भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे…आणि या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादीत सध्या सर्व काही ठिक नाहीत, अशा चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत…नेमकं काय आहे हा ऑडिओ क्लिपचा प्रकार… आणि पार्थ पवारांच्या भेटीमागचं कारण काय…पाहूया हा रिपोर्ट…