कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 20 मे पर्यंत दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस झाला. पावसाच्या अलर्टबाबत पुण्याच्या विभागीय आयु्क्तांनी कालच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.नुकसान भरपाईबाबतही सुचना देण्यात आल्यात अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.