Kolhapur| पन्हाळा, करवीर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं; भामटे, नावलीत ढगफुटी सदृश पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि पन्हाळा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय.शनिवारी झालेल्या पावसाने काही झाडे पडली, तर पाणी साचल्याने काही मार्ग बंद होते. करवीर तालुक्यातील भामटे गावात डोंगरातील मुरूम माती कोसळून एका घरात घुसली.डोंगरातील माती मुरूम घसरल्याने भूस्खलनसदृश परिस्थिती निर्माण झाली.तर पन्हाळ्यातील नावली या गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र घरांमधील साहित्याचं नुकसान झालं आहे.

संबंधित व्हिडीओ