शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणारेय.महाडच्या चांदे येथील क्रिडांगणावर आज राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा होणारेय.यासाठी अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश सोहळाही अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडणारेय.स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशामुळे गोगावले यांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या संपर्कात असलेल्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन गोगावले यांना शह देण्याची राजकीय खेळी तटकरेंनी खेळल्याची चर्चा आहे.