सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण. या कास धरणाची उंची वाढवून पाणी जास्त प्रमाणात कसे साठवता येईल आणि 12 महिने पाणी सातारकरांना कसे मिळेल यासाठी सातारा प्रशासकिय यंत्रणेने प्रयत्न केला.मात्र या धरणाची उंची वाढवताना या भागातील लाखो झाडांना त्याचा फटका बसला.काही झाडे ही तोडली गेली तर काही झाडे ही पाण्याखाली गेली.या भागातल्या जंगलाची काय परिस्थिती झाली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहूल तपासे यांनी.