Mumbai Palika| मुंबईतल्या रस्त्याच्या कामांना 30 मेची डेडलाइन,20 मेपासून काँक्रिट टाकण्याची कामे बंद

मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामे ३१ मेनंतर थांबवण्यात येणार आहेत. मात्र रस्त्यांवर काँक्रीट टाकण्याचे काम २० मे रोजी बंद केले जाणार आहे.वसाळ्यात काँक्रीट सुकत नाही, त्यामुळे काँक्रिट टाकण्याशिवाय जी कामे शिल्लक आहेत, ती २० मेपासून ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे स्वतः कामाच्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेत आहेत. कामे वेळेत पूर्ण करा, त्याचबरोबर कामात हलगर्जीपणा - निष्काळजीपणा नको, कामाचा दर्जा राखा, अशी सक्त ताकीद त्यांनी कंत्राटदारांना आणि पालिकेच्या अभियंत्यांना दिली आहे. ज्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत, ती पूर्ण करून रस्ता मास्टिक अस्फाल्टने आच्छादित करण्याच्या सूचना प्रशासनाकडू देण्यात आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ