पुण्याच्या ससून रुग्णालयातील वादाचा फटका दीडशे बालकांना बसलाय.सध्या या रुग्णालयातील दीडशे बालकांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रखडल्यात.ससून रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर 7 शस्त्रक्रिया विभाग आहेत.त्यांचे नूतरणीकरण करण्यात आले असून त्यातले एक शस्त्रक्रियागृह बालकांसाठी होते.मात्र सातही गृहावर सामान्य शस्त्रक्रिया विभागाने दावा सांगितला आहे. त्यामुळे बालशस्त्रक्रिया विभागाने वरिष्ठांकडे धाव घेतलीये.हा वाद मिटल्यानंतर दीडशे बालकांच्या शस्त्रक्रिया मार्गी लागणारेय.