संत गजानन महाराजांची पालखी पुढील जून महिन्यात संतनगरी शेगाव येथून आषाढी निमित्त पंढरपूरकडे रवाना होणार आहे.. पालखीतील वारकऱ्यांसाठी शेगाव ते पंढरपूर हा शेकडो कोटी रुपये खर्च करून पालखी मार्ग तयार करण्यात आला आहे. . मात्र ज्या रस्त्यावरून पालखी सोहळा जात आहे, तो रस्ता अतिशय खराब असून या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून रस्ता ठिकठिकाणी चिरला आहे .. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी या रस्त्याची पाहणी करून संताप व्यक्त केला आहे.या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचे टायर त्या भेगा मध्ये जात असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे .. दरम्यान अनेक जण यात दगावले असून जखमी झाले आहेत .. आणि आता पुढील महिन्यात याच मार्गावरून वारकऱ्यांना चालावे लागणार आहे .. त्यापूर्वी हा पालखी मार्ग दुरुस्त करणे गरजेचे आहे ..अशी मागणी नागरिक करीत आहे.