Kolhapur| नववधू-वराची आगळीवेगळी वरात पाहण्यासाठी गर्दी, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी वरात

हत्ती घोड्यांवरून निघालेली लग्नाची वरात तुम्ही पाहिली असेल. पण कोल्हापुरात एक आगळी-वेगळी वरात निघाली. नव वधू-वराची ही वरात चक्क डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून निघाली.कोल्हापुरातल्या या नव वधू-वराने शहरातल्या भर वस्तीत काढलेली ही वरात कोल्हापूरच नाही तर राज्यभरात चर्चेचा विषय बनली. नागरी समस्यांकडं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काढलेली ही वरात होती. या वरातीमुळे कोल्हापूरकर काय करतील याचा काय नेम नाही अशीच काहीशी प्रचिती आली.ही वरात नेमकी कशी आहे त्याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.

संबंधित व्हिडीओ