आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे.ठाकरे गटाकडून नेत्यांवर विविध जबाबदारी देण्यात आली. तसेच नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती मागवण्यात आली.तर उद्यापर्यंत यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली.याचा अहवाल 19 जूनपर्यत म्हणजे उद्याच शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.