Akola Drought| अकोल्यातील डोंगरगावात दुष्काळाची स्थिती काय? सांगताहेत विनोद तळेकर | NDTV मराठी

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे.... मराठवाडा, विदर्भासह कोकणही दुष्काळाच्या छायेत आहे.ऑक्टोबरमध्ये दरवर्षी धरणं, विहीरी, नद्या भरल्या दिसतात यंदा मात्र जिकडे पाहवं तिथे जमिनीला भेगा आणि आपल्या बळीराजाच्या डोळात पाणी दिसतंय. 1972, 2016 नंतर यंदा ही दुष्काळी स्थिती ओढावलीय. पाऊस पडेल या आशेनं शेतकऱ्यांनी गाठीशी असलेल्या पैशातून दुबार, तिबार पेरणी केली मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं पिकं पार करपली.. ना पाणी आहे, ना जनावरांना द्यायला चारा त्यामुळे जनावरांना जगावयंच कसं ...आपण जगायचं कसं अशा प्रश्न बळीराजाला पडलाय. याच शेतकऱ्यांच्या बांधावरचं भीषण वास्तव आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. बीड, अकोला, जालन्यातील विदारकता आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतायत...

संबंधित व्हिडीओ