MPSC चा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे; अभिनंदन करत Sushma Andhare यांचा वाघोलेंना सल्ला

MPSCचे अध्यक्ष विवेक भिमनवार रजेवर गेल्यावर आता MPSCचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोंलेंकडे सोपवण्यात आलाय. राज्यपालांनी यासंदर्भात आदेश जारी केलाय. राज्य सरकारनं चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आणि अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलन मागं घेतलं होतं. दरम्यान सतीश वाघोले हे सप्टेंबरमध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले होते. 7 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून विवेक भीमनवार यांनीच सतीश वाघोले यांना सदस्य म्हणून गोपनीयतेची शपथ दिली होती. आता एका महिन्यानंतर बदलेल्या परिस्थितीमुळं सतीश वाघोले यांच्यावर अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सतीश वाघोलेंचं अभिनंदन केलंय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ