उद्या संसदेच्या विशेष अधिवेशनात तीन विधेयक सादर केली जाणार आहेत.. यात महिलांना एक तृतियांश म्हणजे 33 टक्के आरक्षण देण्यासाठी सप्टेंबर 2023 मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, महिला आरक्षण लागू करणे हे जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा लागू झाल्यानंतर शक्य होणार आहे. आता केंद्र सरकारने महिलांना लोकसभेत व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, उद्या विशेष अधिवेशनाआधी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध दर्शवण्यात येणार आहे. महिला आरक्षण विधेयकाला या पक्षांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला असला तरी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला उद्या राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आण उद्धव ठाकरे गटाकडून विरोध केला जाणार आहे.