Special Report|'उडता महाराष्ट्र' राज्याला ड्रग्सचा विळखा, या ड्रग्सचा विळखा महाराष्ट्राला कसा बसलाय?

गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका कॉन्सर्टमध्ये ड्रग्समुळे दोघांचा मृत्यू झाला आणि ड्रग्सवरुन पुन्हा रान पेटलं. त्यातच मिरा भाईंदरमधला एक व्हिडीओ समोर आलाय. त्यात एकजण अगदी झोम्बीसारखा वागतोय... धक्कादायक बाब म्हणजे त्यानं झोम्बी नावाचं ड्रग्स घेतल्याचं बोललं जातंय. तिकडे भंडाऱ्यातील शाळा कॉलेजबाहेरही ड्रग्स मिळत असल्याचा दावा खुद्द आमदार महोदयांनीच केलाय... त्यामुळे ड्रग्स आता शहरापुरतं नाही तर तुमच्या आमच्या गावापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र होतोय का? असं विचारण्याची वेळ आलीय... माणसाला माणसातून उठवणाऱ्या, माणसाला जनावर करुन टाकणाऱ्या या ड्रग्सचा विळखा महाराष्ट्राला कसा बसलाय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ