'महापालिकेत आत्मे दिसतात, तिथे मुडदे गाडले जायचे', मंत्री Sanjay Shirsat यांचं अजब विधान

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या इमारतीबाबत केलेल्या एका अजब आणि खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ""ज्या जागेवर महापालिकेची इमारत उभी आहे, तिथे पूर्वी मुडदे गाढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने तिथे आत्मे फिरतात आणि त्यामुळेच तुम्ही बेचैन होता," असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी यांनी केले आहे. या विधानामुळे आता अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

संबंधित व्हिडीओ