Ashok Kharat प्रकरणात 6 जणांची चौकशी सुरू, गेल्या 10 तासांपासून शिर्डी पोलिसांकडून चौकशी

अशोक खरात प्रकरणात सहा जणांची चौकशी सुरु.. गेल्या दहा तासांपासून शिर्डी पोलीसांत चौकशी सुरु.खरातचे दोन भाचे प्रदिप पोकळे , नितीन पोकळे, खरातचा निकटवर्तीय दिपक लोंढे , सतिष देशमुख यांची चौकशी सुरु.जमीन खरेदी प्रकरणात 5 कोटी 52 लाख रुपये खरातच्या खात्यावर ह्या संबंधितांनी रक्कम पाठवली असल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आली.. तसेच समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणी देखिल चौकशी सुरु.. सह्यांचे पॅटर्न तसेच कागदपत्रांची पडताळणी करणे सुरु. समता पतसंस्थेच्या 57 खातेदारांच्या 100 खात्याची चौकशी अंतिम टप्प्यात.. 57 पैकी 38 खातेदारांची चौकशी पुर्ण.

संबंधित व्हिडीओ