साताऱ्याच्या फलटण ग्रामीण रुग्णालयात पुन्हा धक्कादायक घटना समोर आलीय..काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाप्रमाणेच आणखी एक घटना घडलीय.फिटनेस सर्टिफिकेट देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून धमकावल्याचा आरोप डॉ राजेंद्र रुपनवर यांनी केलाय.रुपनवर कार्यरत असताना प्रसाद कोंडे देशमुख हे एका खाजगी बॉडीगार्डसह तिथे आले.त्यांनी मला बंदूक लायसन्स काढायचे आहे मला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास द्या असं सांगितलं मी नकार दिल्यानंतर मला धमकावलं आणि मारहाण केल्याचा आरोप रुपनवर यांनी केलाय.