अमरावती विधान परिषदेच्या जागेवर विप्लव बाजोरिया यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती... मात्र त्यांना नागपूर खंडपीठातून तातडीने दिलासा मिळाला नाही.निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निकालावर सुनावणीस कोर्टाने नकार दिलाय.तातडीने सुनावणी करण्यास कोर्टाने हा नकार दिलाय..याप्रकरणी काही दिवसानंतर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विप्लव बाजोरिया यांना तातडीने दिलासा मिळालेला नाही.. दरम्यान, ज्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे आम्ही आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत. मग आता तेच प्रतिज्ञापत्र अवैध कसे ठरू शकते, असा प्रश्न शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी..