सोलापूर विधान परिषदेत काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत.महाविकास आघाडीचा आता उमेदवार कोण यासाठी अकलूजमध्ये बैठक पार पडणार आहे.शरद पवार गटाचे वसंत देशमुख , ठाकरे गटाचे धनंजय डीकोळे , नागेश अक्कलकोटे आणि आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर अशा चार जणांची आज अकलूज येथे बैठक होणार आहे. तर उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेस आमच्या सोबतच राहणार अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी दिलीय.