विषारी दारू विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल सिंग वीरका याच्या घरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोटीस लावलीय.. हे घर अनधिकृत असल्याने 24 तासांत स्वतःहून जमीनदोस्त करावे, अन्यथा महापालिका ते पाडेल, असा आदेश नोटीसमध्ये देण्यात आला आहे..दरम्यान, महापालिकेच्या २४ तासांच्या अल्टिमेटमनंतर, सध्या बंद असलेल्या या घरातील सामान त्याच्या नातेवाईकांनी तातडीने बाहेर काढायला सुरुवात केली आहे.याबाबत घराच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी, सूरज कसबे यांनी पाहुयात..