Amravati Rain Alert| मेळघाटात मुसळधार पाऊस, सीपना नदीला महापूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला

अमरावती जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मेळघाटातील सीपना नदीला महापूर आला असून नदीवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पूर्णा नदीवरील धरणाचे तीन गेट उघडण्यात आल्याने नदी-नाल्यांनाही पूर आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ