शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर खालच्या पातळीचे शब्द वापरून टीका केलीय. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचा चमचा असून परबांनी बदनामी केल्याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं रामदास कदम म्हणालेत. परबांनी हॉटेल्सवरुन आरोप करुन माझ्या मुलाला आणि पत्नीला बदनाम करायचं प्रयत्न केल्याचा आरोपही रामदास कदमांनी केलाय.