दोन दिवसा पासून सूरू असेलल्या पावसामुळं नांदेड जिल्हयात अनेक नदी नाल्याना पूर आला.नांदेड शहराजवळच्या पासदगाव येथील आसना नदीला पूर आला. पुराचे पाणी पुलावरुन वाहत आहे. त्यामुळें नांदेड-मालेगांव दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसापासुन सूरू असेलल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आलापैंनगंगा नदीला पूर आल्याने नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप आले..नांदेड जिल्हयातील इसलापुर येथील सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झाले.. किनवट तालुक्यात इस्लापुर इथे नांदेड - यवतमाळ सिमेवर हा धबधबा आहे.सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे पैनगंगा नदीला पुर आला.धबधबा पाहण्यासाठी ईथे पर्यटक गर्दी करत आहेत.