बिग बॉस फेम एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. पहाटे पाचच्यादरम्यान 5-6हल्लेखोरांकडून गोळीबार झाल्याचं समजत आहे. गँगस्टर हिमांशू भाऊने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.घटनेच्या वेळी एल्विश यादव घरी उपस्थित नव्हता, फक्त त्यांचा केअरटेकर घरी होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गुरुग्राम पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत.