धुरंधर राजकारणी अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडण्याबाबत पहिल्यांचं कबुली दिली. राज्यात 1978 साली पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोदचा प्रयत्न झाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वसंतदादांचे सरकार पडले.त्यामागे शरद पवारांचा मोठा हात होता. त्यामुळेच शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा अनेकदा आरोप केला जातो. आता शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार मी पाडले असं जाहीर वक्तव्य केलं.