अलौकिक स्वरांची देणगी लाभलेल्या, आपल्या गायकीनं रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यात आला. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. लाडक्या आशाताईंना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबियांसह सचिन तेंडूलकर, रश्मी ठाकरे यांच्यासह उपस्थित प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते.