Rupali Chakankar यांच्या बहिणीची 6 तास चौकशी; Kharat-चाकणकर यांचे संबंध काय होते?चौकशीतून उघड होणार?

रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची खरात कनेक्शन प्रकरणी चौकशी सुरू झालीय.अशोक खरातची शिर्डीमधल्या समता पतसंस्थेत तब्बल १०० खाती आहेत. या खात्यात अर्थातच कोट्यवधी रुपये आहेत. अशोक खरातनं वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या नावानं ही खाती उघडायला लावली आणि या सगळ्या खात्यांमध्ये नॉमिनी आहे तो अशोक खरातच. त्यामुळे हे गौडबंगाल नेमकं काय आहे, त्याची चौकशी आता सुरू झालीय आणि त्यातलंच नाव आहे प्रतिभा चाकणकर.प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांची आज तब्बल सहा तास चौकशी झाली.या चौकशीतून काय बाहेर आलं ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण याच चौकशीतून खरात आणि रुपाली चाकणकर यांचे संबंध नेमके काय होते, ते सुद्धा उघड होणार आहे.

संबंधित व्हिडीओ