बिबट्या आला रे आला... Jalgaon मध्ये राजकीय ड्रामा; बिबट्याला MLA चंद्रकांत पाटलांनी मारले फटके

बिबट्या आला रे आला... असं एक थरारक नाट्य जळगावात घडलं. सध्या बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलीय.नाशिक, जळगाव, पुण्यात बिबटे मानवी वस्तीत घुसू लागलेत. तसाच एक बिबट्या जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये घुसला. त्याला पकडायला पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत होते... पण हे सगळं सुरू असताना एक खळबळजनक प्रकार घडला... तो म्हणजे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला काठीनं मारलं. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारलेला असतानाच त्याला चंद्रकांत पाटलांनी काठ्यांचे फटके मारले. त्यानंतर जळगावात एक वेगळाच ड्रामा सुरू झाला.

संबंधित व्हिडीओ