NDTV मराठीवर बातमी दिसताच यंत्रणा खडबडून जागी झालीय. मुंबईच्या विक्रोळीतील कन्नमवार भागातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली होती. वायर टाकण्याच्या कामासाठी खोदलेले रस्ते फक्त खडी टाकून बुजवण्याचा प्रयत्न कऱण्यात आला होता. मात्र कंत्राटदाराकडून सुमार दर्जाचं काम झाल्याची बाब समोर येताच NDTV मराठीने बातमी केली. या बातमीची थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेत महापालिका आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले. तसंच चौकशीनंतर काय कारवाई केली याबाबतची माहिती देण्यासही सांगतलं. प्रशासकीय यंत्रणा हालताच स्थानिक तक्रारदार परवीन सय्यद यांनी NDTV मराठीचे आभार मानलेत. स्थानिक तक्रारदार परवीन सय्यद यांनी NDTV मराठीचे आभार मानलेत.