सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. याबद्दलची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी खबऱ्यांच्या आधारे गोळीबार करणारे कोण आहेत याचा शोध लावला. गोळीबार करणाऱ्यांचा ठावठिकाणा लागल्यानंतर पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला. आरोपींनी पोलिसांवर 5 गोळ्या झाडल्या, मात्र पोलिसांनी शिताफीने एका आरोपीला पकडण्यात यश मिळवले. शहाबाद असं आरोपीचं नाव आहे. त्याचा साथीदार पळून गेला असून त्याचा शोध घेतला जात आहे.